भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही ये तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई

tumhi ye tari sanga kanhin | amhanvishin rakhumabai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही ये तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥१॥ कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देई ॥ध्रु.॥ टोंकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥२॥ प्रेम देउनि बहुडा झाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥