भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं तंव उदार मायबाप संत । करावें कृतार्थ मजलागीं

tumhin tanv udar mayabap sant | karaven krutartha majalagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हीं तंव उदार मायबाप संत । करावें कृतार्थ मजलागीं ॥१॥ ठेवा माथां हात वंदुं पायवाणी । आणिक दुजें मनीं नाहें कांहीं ॥२॥ गुण दोष याती न पहा कारण । करितो भजन निशिदिनीं ॥३॥ एका जनार्दनीं तयाचा मी दास । एवढीची आस पायी मिठी ॥४॥