भजनी मालिका

भजने

चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प । अति सार ॥१॥ शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान। खंडी नारायण दुःख चिंतनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चांगा वतेश्वर मुक्ता निवृत्तीश्वर । सावंत कुंभार ऐहिक ते ॥१॥ एके ठायीं मिळाले परब्रह्म गवसून । वटेश्वर सोपान मध्यभागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥ रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं म्हुण ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

चाडियामुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें ॥१॥ तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोपटाचि राहे वाढोनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चातकाची तहान किती । तृप्ति करूनि निववी क्षिती ॥१॥ धेनु वत्सातें वोरसे । घरीं दुभतें पुरवी जैसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चातुर्यसागरा आमुची जननी । जाणते रुक्मिणी प्रेम-कळा ॥१॥ चरणींची प्रभा जाणे मणिग्रीव । नकुळ वैष्णव सखे माझे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चांदणें नावडे चोरा । सद्‍बुद्धि नावडे रांडेच्या पोरा । वृक्ष नावडे कुंजरा । सत्य कुचरा नावडे ॥१॥ चंदन जाणावा सुगं-धाची धृति । कर्पूर जाणावा उत्तम याति । हंस जाणावा चालतिये गति । कोकिळ श्रुति ओळखावी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चांदाळादि ब्राह्मण सर्व नारिनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥ नामाविण गति नसेचि आणिक । वैकुंठनायक सुलभ देखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चार देह चार अवस्था समाधी । कासया उपाधि करिसी बापा ॥१॥ चार वेद जाण युगें प्रमाण । पांचवें विवरण न करी बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चार मुद्रा आणि समाधी त्या चारी । दिसती चक्राकारी स्वरुप हें ॥१॥ चहूं समाधीचें पाहीं हें देखणें । विकळतां तेणेंक सहजीं व्हावी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ