भजनी मालिका
← भजनांकडे परत

चातकाची तहान किती । तृप्ति करूनि निववी क्षिती

chatakachi tahan kiti | trupti karuni nivavi kshiti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चातकाची तहान किती । तृप्ति करूनि निववी क्षिती ॥१॥ धेनु वत्सातें वोरसे । घरीं दुभतें पुरवी जैसें ॥२॥ पक्कान्न सेवुं नेणती बाळें । माता मुखीं घालीं बळें ॥३॥ एका जनार्दनीं बोले । एकपण माझें नेलें ॥४॥