भजनी मालिका
← भजनांकडे परत

चातकाचे जिवन घनु तरि तो

chatakache jivan ghanu tari to

चातकाचे जिवन घनु तरि तो सये एका धिनु । आला वेळु भुलावणु जैसा नळुनि सिना नाहीं भानु ॥१॥ चंद्रासवें चकोर मिळोनियां पूर्णिमेसि विरोधु मांडिला । तो योगु निमिळे म्हणोनि तो प्रसंग विपाईला वेगळा रया ॥२॥ तैसें माणुसपण सहज तनुवरी देवाचा वारा । स्वाधिनु तैसा बापरखुमादेविवरु विठ्ठलु न विसंबावा एकक्षणु ॥३॥