भजनी मालिका
← भजनांकडे परत

चातकाचें ध्यान मेघाचें जीवन

chatakachen dhyan meghachen jivan

चातकाचें ध्यान मेघाचें जीवन । आम्हां नारायण तैसा सखा ॥ १ ॥ चकोरा अमृत चंद्र जिववितें । भक्तांसि दुभतें हरि आम्हां ॥ २ ॥ विश्रांतीसी स्थळ वैकुंठ सफळ । दुभतें गोपाळ कामधेनु ॥ ३ ॥ आशापाश नाहीं कर्तव्या कांही । चिंतामणि डोहीं एकविध ॥ ४ ॥ समिरासगट गति पावली विश्रांति । नामरूप जाति भेदशून्य ॥ ५ ॥ नामाची हे धणी तेचि हो पर्वणी । तृप्तातृप्त कृष्णीं होतु आम्हां ॥ ६ ॥ सांडिले पैं द्वैत दिधलें पै अद्वैत । हरीविण रितें न दिसे आम्हां ॥ ७ ॥ निवृत्ति परिवार मुक्तलाग अरुवार । रत्नांचा सागर नामें वोळे ॥ ८ ॥