भजनी मालिका
← भजनांकडे परत

चांगा वतेश्वर मुक्ता निवृत्तीश्वर । सावंत कुंभार ऐहिक ते

changa vateshvar mukta nivruttishvar | savant kumbhar aihik te

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चांगा वतेश्वर मुक्ता निवृत्तीश्वर । सावंत कुंभार ऐहिक ते ॥१॥ एके ठायीं मिळाले परब्रह्म गवसून । वटेश्वर सोपान मध्यभागीं ॥२॥ सोपान वटेश्वर घेतले वोसंगळा । माळा घाली गळां पुंडलिक ॥३॥ सोपान वटेश्वर पूजिती आवडीनें । संगतीं निधान पांडुरंग ॥४॥ आनंदानें सारे बैसले एकवट । विस्तारिलें ताट रखुमाईनें ॥५॥ नारा विठा गोंदा बोलाविला माहादा । नामा म्हणे पूजा अवघे जन ॥६॥