भजनी मालिका
← भजनांकडे परत

चातुर्यसागरा आमुची जननी । जाणते रुक्मिणी प्रेम-कळा

chaturyasagara amuchi janani | janate rukmini prem-kala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चातुर्यसागरा आमुची जननी । जाणते रुक्मिणी प्रेम-कळा ॥१॥ चरणींची प्रभा जाणे मणिग्रीव । नकुळ वैष्णव सखे माझे ॥२॥ कुबेर गौतम वधू अहिल्या । चक्रपाणी तया मुक्त केलें ॥३॥ नामा ह्मणे तुझे पायीं संजीवन । सदाशिव ध्यान तेंचि करी ॥४॥