भजनी मालिका

भजने

कैं तयामागें चरण चालती । ऐशी वाटे खंती दिनराती ॥१॥ कैं या मनाची पुरेल वासना । कैं मिठी चरणा देईन जीवें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैं मनींची इच्छा पुरेल ही धांव । पाहीन पंढरीराव जाऊनियां ॥१॥ आलीया जन्माचें होईल सार्थक । निवारेल दुःख भव पीडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि ॥१॥ मूळचि नाहीं डाळ तें कैंचे । लटिकें साचें काय म्हणों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कैचें भांडवल खरा हातीं भाव । कळवळ्यानें भाव दावीतसें ॥१॥ आतां माझा अंत नको सर्वजाणा । पाहों नारायणा निवडूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैंचें सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥ कैंचा देव कैंचा भक्त । कैंचा शांत कैंचा अशांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैलास भुवनीं । देव वैसले सिंहासनीं । आपण भवानी । कर जोडुनी उभी असे ॥१॥ भक्तिरस द्यावा । तेथील अनुभव ध्यावा । नित्य हरिजागरू सांगावा । कोण फळ तयाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कैलासासा वास अधिक सिद्धबेट । विष्णूचें वैकुंठ पुरातन ॥१॥ भूमीवरी पंढरी तैसी आळंकापुरी । पंच कोशावरी पुण्यभूमी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पति योगिराज ॥१॥ तयाचिया पाया माझे दंडवत । घडो आणि प्रीत जडो नामीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कैवल्य निधान तुम्ही संतजन । काया वाच मन जडलें पायीं ॥१॥ सर्वभावें दास अंकित अंकीला । पूर्णपणें जाहला बोध देहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥१॥ ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानीं । सकळांसी शिरोमणी । ज्ञानोबा माझा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैवल्याची राशी वैष्णवांचे घरीं । मुक्ति भुक्ती कामारी आहे जेथें ॥१॥ तो हा विठ्ठल निधान परेपरता उभा । सांवळी ती प्रभा अंगकांती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥ काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हरी घेसी कोण आड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम