भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैवल्याच्या तुम्हां घरीं । राशी हरी उदंड

kaivalyachya tumhan gharin | rashi hari udand

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैवल्याच्या तुम्हां घरीं । राशी हरी उदंड ॥१॥ मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥ सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥३॥