भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैंचा मज धीर । कोठें बुद्धि माझी स्थिर

kaincha maj dhir | kothen buddhi majhi sthir

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैंचा मज धीर । कोठें बुद्धि माझी स्थिर ॥१॥ जें या मनासी आवरूं । आंत पोटीं वाव धरूं ॥ध्रु.॥ कैंची शुद्ध मति । भांडवल ऐसें हातीं ॥२॥ तुका म्हणे अंगा । कोण दशा आली सांगा ॥३॥