भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैचें भांडवल खरा हातीं भाव । कळवळ्यानें भाव दावीतसें

kaichen bhandaval khara hatin bhav | kalavalyanen bhav davitasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैचें भांडवल खरा हातीं भाव । कळवळ्यानें भाव दावीतसें ॥१॥ आतां माझा अंत नको सर्वजाणा । पाहों नारायणा निवडूनि ॥ध्रु.॥ संतांचें उच्छिष्ट मागितले पंगती । करावें संगती लागे ऐसें ॥२॥ तुका म्हणे आलों दावूनि विश्वास । संचित तें नास पावे ऐसें ॥३॥