भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैं तयामागें चरण चालती । ऐशी वाटे खंती दिनराती

kain tayamagen charan chalati | aishi vate khanti dinarati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कैं तयामागें चरण चालती । ऐशी वाटे खंती दिनराती ॥१॥ कैं या मनाची पुरेल वासना । कैं मिठी चरणा देईन जीवें ॥२॥ कैं हें भाळ ठेवीन चरणीं । कैं पायवनी घेईन सुखें ॥३॥ एका जनार्दनीं कैं होईल कृपादान । कैं नारायण प्रेमें भेटे ॥४॥