भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका दामासेठी सांगतों तुम्हासी । द्रव्यही कुळासी मागुन घ्यावें

aika damasethi sangaton tumhasi | dravyahi kulasi magun ghyaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐका दामासेठी सांगतों तुम्हासी । द्रव्यही कुळासी मागुन घ्यावें ॥१॥ मालधनी आलों घेऊनियां घरा । तुम्ही कां दातारा गांजितसां ॥२॥ नामदेव म्हणे धोंडोबा नाईका । मिती आणि पैका द्यावा वेगीं ॥३॥