भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकतां वचन कान्हया म्हणती गडी । काय खेळायाची आतां न धरुं गोडी

aikatan vachan kanhaya mhanati gadi | kay khelayachi atan na dharun godi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकतां वचन कान्हया म्हणती गडी । काय खेळायाची आतां न धरुं गोडी ॥१॥ लावियेला चाळा त्वा जगजेठी । आतां आम्हां सांगसी तुं ऐशा गोष्टी ॥२॥ एका जनार्दनीं कान्होबा खेळ पुरे आतां । मांडु रे काला आवडी आनंता ॥३॥