भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका कलियुगींचा आचार । अधर्मपर झाले नर

aika kaliyugincha achar | adharmapar jhale nar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐका कलियुगींचा आचार । अधर्मपर झाले नर ॥१॥ मंचकावरी बैसे राणी । माता वाहतसे पाणी ॥२॥ स्त्रियेसी अलंकार भूषण । माता वळीतसे शेण ॥३॥ स्त्रियेसी पाटावाची साडी । माता नेसे चिंध्या लुगडीं ॥४॥ सासुसासर्‍यां योग्य मान । मायबापा न घाली अन्न ॥५॥ साळी सासवा आवडती । बहीणभावां तोंडीं माती ॥६॥ स्त्रियेसी एकांतगोडी । मातेसी म्हणे रांड वेडी ॥७॥ म्हणे विष्णुदाम नामा । ऐसा कलियुगींचा महिमा ॥८॥