भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीं । माझा ज्ञानराज गोपाळाशी लाहा वाटी

ekach tali jhali chandrabhage valavantin | majha dnyanaraj gopalashi laha vati

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीं । माझा ज्ञानराज गोपाळाशी लाहा वाटी ॥१॥ नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥ अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरला । प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचूं लागला ||३|| नाचतां नाचतां देवाला गळला पितांबर । सावध होई देवा ऐसा बोले कबीर ||४|| साधु या संतांनी देवाला धरिला मनगटीं काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥