भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक वेळ गाय विठ्ठलाचें नाम । मोक्ष मुक्ति सकाम पुढे उभें

ek vel gay viththalachen nam | moksha mukti sakam pudhe ubhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक वेळ गाय विठ्ठलाचें नाम । मोक्ष मुक्ति सकाम पुढे उभें ॥१॥ आवडीने घाली तया लोटागण । संताचें चरण वंदी माथां ॥२॥ पंढरेची वारी संतांचा सांगात । पुरती सर्व हेत निश्चयेंसी ॥३॥ एका जनार्दनीं धरुनि विश्वास । संतांचा दास होय आधी ॥४॥