भजनी मालिका

भजने

येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥ विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे भंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येरी म्हणे काय करूं वो सुंदरी । आतां आहे धरीं काय माझें ॥१॥ प्राणनाथें पेणें केलें स्वर्गलोकां । जाईन मी देखा तयासयें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनि प्रात:काळी । मिळले नंदाच्या राऊळीं । करिती जागे श्रीकृष्ण ॥१॥ दसवंती म्हणे गोकुळांसी । निद्रित आहे हषिकेशी । पुढें जा घेउनी गोधनासी । जाग झालिया येईल ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी । विश्वकर्मा येऊनियां निमिशावरी । नगर शृंगारी कौतुके ॥१॥ निजेलीचे असतां नारीकुमरें । शृंगारिलीं वस्त्रे अळंकारें । वृध्द होताती ते निमासुरे । रुंपे मंडित योजिलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येरु तो निवांत होउनी त्याठायीं । राहोनियां कांहीं करिता झाला ॥१॥ न कळे भक्तिभाव घ्यावें कैसें त्यासी । देव कोण त्यासी ठावें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येरे दिवशीं घेउनी सवें । गोवळ खिल्लारांचे थवे यमुनातटाकीं नित्य नवे । खेळ खेळती विचित्र ॥१॥ म्हणे यारे चेंडूफळी । खेळों अवघे मिळोनी बळी । ऐसें बालोनियां वनमाळीं । कास घालित नेटकी ॥२॥ चें

रचनाकार: संत निळोबा

येरे देवा तुला देईन मी पेडा । वेगीं बाहे वेडा नामदेव ॥१॥ ज्याचे पायीं असे बिरुदाचा तोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येरें शब्द ते ऐकोन । उभा ठाकला जगज्जीवन । माता म्हणे हे अवगुण । कांरे ऐसे करितोसी ॥१॥ ठायीं वाडिलिया न जेविसी । आणि येथें माती खाशी । येरु म्हणे नाहीं ऐशी । प्रतिज्ञा मी दावीन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा