भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरीकडे गंगातीरीं। कवतुक दाखवी श्रीहरी

yerikade gangatirin| kavatuk dakhavi shrihari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
येरीकडे गंगातीरीं। कवतुक दाखवी श्रीहरी ॥१॥ धर्मासहित साहीजण ऋषिलागी देती अन्न ॥२॥ रत्नखचित मंडपा आंत पंगती बैसल्या आनंदभूत || ३॥ नानापरिचें दिव्य अन्न वादी द्रौपदी आपण||४|| मिठी पडली वदनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥