भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरी म्हणे काय करूं वो सुंदरी । आतां आहे धरीं काय माझें

yeri mhane kay karun vo sundari | atan ahe dharin kay majhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येरी म्हणे काय करूं वो सुंदरी । आतां आहे धरीं काय माझें ॥१॥ प्राणनाथें पेणें केलें स्वर्गलोकां । जाईन मी देखा तयासयें ॥२॥ वडिलपणें तुह्मी लोभ असों द्यावा । सांभाळ करावा बाळकांचा ॥३॥ वागुरे माझारी गुंतलासे कांत । कायसें जीवित विचारी पां ॥४॥ न लावीं उशीर जाईं येच क्षणीं । अससी गर्भिणी पूर्ण दिवस ॥५॥ जरी देसी प्राण पतन गर्भासी । होय ते दोषासी पात्र होसी ॥६॥ पोसोनियां बाळें वाढवीं वंशाला । द्यावें चित्त बोला माझ्या आतां ॥७॥ पळावया तुज नाहीं अंगीं बळ । न देखतां खळ जाईं वेगीं ॥८॥ नामा ह्मणे ऐसीं उत्तरें ऐकिलीं । तेही घाबरली तयेवळे ॥९॥