भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया

yethen dusari na sare ati | deva bheti javaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥ तोचि ध्यावा एक चित्त । करूनि रितें कलेवर ॥ध्रु.॥ षडउर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥२॥ तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥३॥