भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय

yethen boloniyan kay | vhava guru tari jay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥ मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥ ऐकोनि मरसी कथा। जंव आहेसि तुं जीता ॥२॥ हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥३॥ पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥४॥ आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडूं कळिकाळाचें शीर ॥५॥ घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्ती मुखें नाम ॥६॥ तुका म्हणे मुक्ती । नाहीं आस च ये चित्ती ॥७॥