भजनी मालिका

भजने

म्हणती आजि वांचिलों जीवें । जवळी श्रीहरी होतां सवें । तंव ते गांईचे मेळावें । वाडियाकडें मोहरले ॥१॥ मग ते चालिले गोवर । वाजवीत वादयें खेळत खेळ । शिंगें कहाळा घागरघोळ । चांदिवे ध्वज उभारुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणती कृष्ण आवडे कैसा । जीवप्राण का पढिये जैसा । एकी म्हणती गे मानसा । भुलवाणाचि सुंदरपणें ॥१॥ यातें पाहों जातां दिठी । पहाते पहाणेंचि नुरें शेवटीं । संचरोनियां हा पाठीपोटीं । करी आपणासारिखें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणती घेतल्या आम्हीं धनाचिया कोडी । खर्चायला कवडी थार नसे ॥१॥ रडती पडती येरांवरी येर । आनंदाला पार नाहीं म्हणती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

म्हणती दक्षिण द्वारका । पुण्यभुमी वैकुंठीं देखा । पाहुनियां पुंडलीका । राहिलासे उभा विटेवरी ॥१॥ काय वर्णावा महिमा । न कळेचि आगम निगमं । वेदादिक पावले उपरमा । जयासी पैं वर्णितां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

म्हणती दसवंतीये देख देख । वोजे पाहे याचें मुख । लोणीं माखलें साजूक । आणि दहींही गिरबडलें ते वरी ॥१॥ पाहे यशोदा जंव निर्धारी । तंव माग देखे मुखावरी । मग झडपिती अवघ्या नारी । कैसें बोलत होतीसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणती धालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥१॥ चाल चाल रे कान्होबा । खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणीं । गाई जमा करूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणती नको नको जाऊं हरी । सांडोनी आम्हां कोठें दुरी । तुजवांचोनिया संसारी । कोण आम्हां जिवलग ॥१॥ जातील प्राण तुतें जातां । वियोग न साहावे तें व्यथा । पळमात्रचि वेंगळे पडतां । जेविं कां मासोळी जळांतील ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणती पाठवावा अक्रूर । कृष्णीं त्याचा मित्राचार । त्याचें नुलंघी तो उत्तर । सहसा प्राण गेलिया ॥१॥ देऊनियां उत्तम रथ । मूळ पाठवावा तो त्वरित । सांगावें भेटीसी उदयत । मामा तुझे कंसरावो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणती सकळ द्विज जावें प्रतिष्ठाना । तेथुनी पत्र आणा तें वंद्य करुं ॥१॥ नाहीं जाती कुळ वर्ण अधिकार । क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

म्हणवितां हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥ आयुष्यधन त्याचें नेले यमदूतीं । भुलविला निंश्चितीं कामरंगें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणवितां हरीदास कां रे नाहीं लाज । दीनासी महाराज म्हणसी हीना ॥१॥ काय ऐसें पोट न भरेसे जाले । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥१॥ ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणविती भक्त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचे ॥१॥ त्यांसि राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहों नेदी

रचनाकार: संत तुकाराम