भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणविती भक्त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचे

mhanaviti bhakta hariche ankit | karito anant hit tyanche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणविती भक्त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचे ॥१॥ त्यांसि राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहों नेदी पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळाचिये ॥३॥ शिळाचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥ एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आम्ही ऐसे ॥५॥ ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । म्हणे तुम्हीं आतां हात सोडा ॥६॥ हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥७॥ दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥ भार आम्हांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥९॥ निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥१०॥ सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकेंचि खरें मानुनियां ॥११॥ यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥१२॥