भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं

mhanaviti aise aikaton sant | na dekhije hot dolan konin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥१॥ ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥ध्रु.॥ पर्जन्याचे काळीं वोहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ॥२॥ हिऱ्याऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन न भेटे तों ॥३॥