भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती पाठवावा अक्रूर । कृष्णीं त्याचा मित्राचार । त्याचें नुलंघी तो उत्तर । सहसा प्राण गेलिया

mhanati pathavava akrur | krushnin tyacha mitrachar | tyachen nulanghi to uttar | sahasa pran geliya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणती पाठवावा अक्रूर । कृष्णीं त्याचा मित्राचार । त्याचें नुलंघी तो उत्तर । सहसा प्राण गेलिया ॥१॥ देऊनियां उत्तम रथ । मूळ पाठवावा तो त्वरित । सांगावें भेटीसी उदयत । मामा तुझे कंसरावो ॥२॥ अक्रूरा सांगावा हाचि अर्थ । जरी तूं नाणिसी कृष्ण येथ । तरी मम हस्तें तुझा घात । होईल जाण तेंच क्षणीं ॥३॥ रायें अक्रर पाचारिला । रथ देऊनियां गौरविला । म्हणे जाऊनियां आतां वहिला । भाचा आणीं भेटीसी ॥४॥ तयालागीं प्राण फुटे । घटिकां पळहि निमिष न लोटे । नणिता लावीन मृत्युवाटें । तुज हें निर्धारें जाण पां ॥५॥ आजींचि घेऊनियां तूं येसी । जरी कां आपुल्या निजमित्रासी । तरि देऊनियां निज भाग्यासी । गौरवीन तुज बहुमानें ॥६॥ निळा म्हणे अक्रूर मनीं । म्हणे हा पापी पापियाहुनी । आणवितो कृष्ण निदानीं । आपुलिया प्राणा घातावया ॥७॥