भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणवितां हरीदास कां रे नाहीं लाज । दीनासी महाराज म्हणसी हीना

mhanavitan haridas kan re nahin laj | dinasi maharaj mhanasi hina

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणवितां हरीदास कां रे नाहीं लाज । दीनासी महाराज म्हणसी हीना ॥१॥ काय ऐसें पोट न भरेसे जाले । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥ तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥३॥