भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती नरदेह पावन । परी अत्यंत निंद्य जाण

mhanati naradeh pavan | pari atyant nindya jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
म्हणती नरदेह पावन । परी अत्यंत निंद्य जाण ॥१॥ योनिद्वारें ज्याचें जनन । सवेंचि मरण लागलेंसे ॥२॥ जंव जन्मलेंचि नाहीं । तंव तें मरण लागलें पाहीं ॥३॥ गर्भाच्याही ठायीं भेवो । मरण भावों न चुकेची ॥४॥ एका जनार्दनीं नाहीं मरण । तेथें नाहीं जनन येणें जाणें ॥५॥