भजनी मालिका

भजने

नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा । निवृत्ति सहजा गुरुवर्या ॥१॥ नमो सोपानदेवा मुक्ताई परेशा । ठाव त्या सर्वेशा कर्‍हातटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ति उदारा सोपान देवा ॥१॥ नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी । आदित्रय जननी देवाचिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें ॥१॥ करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चालतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नमो सदगुरुराया दीनाच्या वत्सला । पावावे दासाला ब्रीद तुझें ॥१॥ ब्रीद तुझें जगीं पतीतपावन । भक्तांसी रक्षणें सर्व काळीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा । नमो सद्गुरु सच्चिदानंदरुपा । नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती । नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ॥१॥ तुझया आठवीं वीसरे आपणातें । तरंगा जळीं घालितां जेवि होते ॥ अळंकार सोनेंचि होऊनि ठेला । निळा यापरी आठवी सद्गुरुला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केबीं पावती ब्रम्हासुख ॥१॥ लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवीं पावती केशवातें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नम्रतेविण योग्यता मिरविती ते केवीं पावती ब्रह्मसुख ।। १ ।। लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवी पावती केशवातें ||२||

रचनाकार: संत जनाबाई

नयन तान्हेलें पाजावें काई । मना खत झालें फाडुं कवण ठायीं ॥१॥ ऐसा कोणीहि वैद्य मिळता का परता । सुखरुप काढी मनाची का व्यथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नयेचि साचा हा प्रतीति । असोनियां भूतीं भगवंत ॥१॥ कर्माकर्में लागलीं पाठीं । बैसले दृष्टी मळ त्यांचे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नरकासुरा वधिलें जेणें । मुरुसी मर्दुनी घेतलें ठाणें । वृत्रासुराचें हरिलें जिणें । तारकासुरा प्राणहानी केली ॥१॥ मधु दैत्याचें सूदन । हिरण्याक्षाचे घेतले प्राण । हिरण्यकश्यपा विदारुन । काळयवन दग्ध केला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा