भजनी मालिका
← भजनांकडे परत

नर देहि पावलास । सद्गुरुताता

nar dehi pavalas | sadgurutata

रचनाकार: संत महंमद · अभंग
नर देहि पावलास । सद्गुरुताता ॥१॥ चहुं खणीचि दुःखे सांगता आपार । येतुसे गहिवर आठवितां ॥छ॥ जड देह तरुवर भलंताचि घालिघाये । दुःख करुणा नये । कोण्हांलागी ॥ २ ॥ ज्या जैसें आवडे । तो तैसे तोडी । बहुजीव चरफडि । बोलता नये ॥३॥ संचित तुझे कृपे घाये बरे होति । मागुते तोडिति पालव नाव ॥४॥ पशुमछ आजा पुत्र । शस्त्रे विदारिती । हे दुःखे फजीति । न कळे कोण्हां ॥५॥ सयाति मध्ये वैराकार चाले । या दुःखाचे घायाळे । हरि पाहातोसि ॥६॥ हरि म्हणे प्रलब्धे । भोगिति सुखदुःख । भक्ति अभक्ति देख । वंदिति निंदिति ॥७॥ हे श्रीवचन ऐकोन । वैरागे आत्मज्ञान। पाहिले परतोन सेख महमदि ॥८॥