भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमोजी पंढरिराया

namoji pandhariraya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नमोजी पंढरिराया । हत्कमलवासीया गुरुनाथा ॥१॥ तुमचा अनुग्रह लाधलों । पात्र झालों महा सुखा ॥२॥ सकळ संत करिती कृपा । दाविला सोपा निज मार्ग ॥३॥ निळा म्हणे दिवस रात्रीं । गातों वक्त्रीं गुण नाम ॥४॥