भजनी मालिका
← भजनांकडे परत

नयनाचे शेजारीं दशवें द्बार बापा

nayanache shejarin dashaven dbar bapa

नयनाचे शेजारीं दशवें द्बार बापा । एक मार्ग सोपा बोलतसें ॥१॥ आधारीं पवन अपान विराजे । आंगुळें चार साजे तयां ठायीं ॥२॥ मणीपुर चक्र नाभिस्थान कमळ । सहा अंगुळांचा खेळ असे तेथें ॥३॥ वायुचक्र अनुहात ह्रदय असे एक । प्राणासी नि:शंक जेथे नेई ॥४॥ अग्नीचक्र भ्रुवांग शोभतें प्रकाशत्त्व । प्राणासी उलथावें तयावरी ॥५॥ सहस्त्रदळीं ब्रह्मरंध्र शोभतसे निळें । प्रकाशाचे उमाळे जेथें असती ॥६॥ ज्ञानदेव म्हणे ऐका प्राणायाम । या अभंगीं नि:सीम अर्थ झाला ॥७॥