भजनी मालिका
← भजनांकडे परत

नये सोमसरी उपचाराची हरी

naye somasari upacharachi hari

नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड ॥१॥ मागतों इतुकें जोडूनियां कर । ठेवूनियां शीर पायंवरी ॥२॥ तुम्हां आम्हांस एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय वरा ॥३॥ तुकयाबंधु म्हणे बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे ॥४॥