भजनी मालिका
← भजनांकडे परत

नयन तान्हेलें पाजावें काई । मना खत झालें फाडुं कवण ठायीं

nayan tanhelen pajaven kai | mana khat jhalen phadun kavan thayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नयन तान्हेलें पाजावें काई । मना खत झालें फाडुं कवण ठायीं ॥१॥ ऐसा कोणीहि वैद्य मिळता का परता । सुखरुप काढी मनाची का व्यथा ॥२॥ डोळ्यांची बाहुली पाहतां झडपली । तिसी रक्षा भली केविं करूं ॥३॥ निढळींची अक्षरें चुकलीं कानामात्रें । शुद्ध त्याहावें कैसें लिहिणारें ॥४॥ जीवीचिया डोळा पडळ आलें । अंजन सुदन केविं जाय ॥५॥ एका जनार्दनीं जाणे हातवटी । पुण्य घेउनी कोणी करा भेटी ॥६॥