भजनी मालिका

भजने

धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥ धुंडितां ते पाय शिणला तो ब्रम्हा । बोल ठेवी कर्मा आपुलिल्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य धन्य सदगुरुराणा । दाखिविलें ब्रह्मा भुवना ॥१॥ उपकार केला जगीं । पावन जालों आम्हीं वेगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ