भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य पुंडलिका । केला तरणोपाय लोकां

dhanya dhanya pundalika | kela taranopay lokan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धन्य धन्य पुंडलिका । केला तरणोपाय लोकां ॥१॥ एका दर्शनेंचि उध्दार । केलें पावन चराचर ॥२॥ चंद्रभागा पंढरपूर । भक्त आणि हरीहर ॥३॥ निळा म्हणे सुलभ केलें । भूमि वैकुंठ आणिलें ॥४॥