भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य पुंडलिक । तारिले लोकां सकळां

dhanya dhanya pundalik | tarile lokan sakalan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य पुंडलिक । तारिले लोकां सकळां ॥१॥ तुझें भाकेंगुतुंनी येथें । तारीन पतीत युगायुगीं ॥२॥ भाळे भाळे येतील जैसे । दरुशनें ते तैसे वैकुंठीं ॥३॥ एका जनार्दनीं देऊनी वर । राहें विटेवर मग उभा ॥४॥