भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर

dhanya dhanya techi nar | dattanamin je tatpar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥ त्याचे होतां दरुशन । पतित होताती पावन ॥२॥ तयालागीं शरण जावें । काया वाचा आणि जीवें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । त्याचें पाय आठवी मनीं ॥४॥