भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य जगीं संत । कृपावंत दीनबंधु

dhanya dhanya jagin sant | krupavant dinabandhu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य जगीं संत । कृपावंत दीनबंधु ॥१॥ कृपादृष्टी अवलोकितां । परिपुर्ण समदृष्टी ॥२॥ अगाधा देणेंऐसें आहे । कल्पातीं हें न सरेची ॥३॥ एका जनार्दनींचित्त । जडो हेत त्या ठायीं ॥४॥