भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य कीर्तन जगीं । संत तेची सभागीं

dhanya dhanya kirtan jagin | sant techi sabhagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य कीर्तन जगीं । संत तेची सभागीं ॥१॥ गाती कीर्तनीं उल्हास । सदा प्रेमें हरिदास ॥२॥ नाहीं आणिक चिंतन । करती आदरें कीर्तन ॥३॥ एका जनार्दनीं शरण । जालों कीर्तनीं पावन ॥४॥