भजनी मालिका

भजने

देव भक्त दोन्हीं तीर्थ क्षेत्र नाम । ऐसा एक संभ्रम कोठें नाहीं ॥१॥ प्रयागादी तीर्थ पहाती पाहतां । न बैसे तत्त्वतां मन माझें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव भक्त दोन्हीं समचि सारखें । पाहातां पारिखें न दिसे दुजें ॥१॥ भक्ताचें अंगें देव असें । देवाचे हृदयीं भक्त वसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव भक्तपणें नाहीं दुजा भाव । एकरुप ठाव दोहीं अंगीं ॥१॥ दुजेपण नाहीं दुजेपण नाहीं । दुजेपण नाहीं दोहीं अंगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥ भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देव मनुष्य सुताचें बाहुलें । बापें बोळवणा सांगातें दिलें ॥१॥ शेवट पालऊन दिसे मधु । नेसो जाय तंव अवघाचि संबंधू ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव म्हणे असे आठवाल फार । लागे उशीर समाधीसी ॥१॥ रुक्माबाई म्हणे याजलागी जाण । ब्रह्मीं ब्रह्म खूण मेळविली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंचि समाधि ज्ञानदेवा ॥१॥ चौयुगां आदिस्थळ पुरातन । गेले तें नेमून मुनिजन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी । काढी पां धुंडोनी मजलागीं ॥१॥ ऐसें म्हणोनी देवें घातलीसे कास । निघे ह्रषीकेश पाहुनी नाम्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव म्हणे नाम्या परीस कोठें आहे । पाहूं लवलाहे दावी मज ॥१॥ हांसूनियां नामा पांडुरंगा सांगे । परीस चंद्रभागे टाकियेला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा । जावें सासवडा उत्सवासी ॥१॥ सोपानासी आम्हीं दिधलें वचन । चला अवघेजण समुदाय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव