भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे असे आठवाल फार । लागे उशीर समाधीसी

dev mhane ase athaval phar | lage ushir samadhisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव म्हणे असे आठवाल फार । लागे उशीर समाधीसी ॥१॥ रुक्माबाई म्हणे याजलागी जाण । ब्रह्मीं ब्रह्म खूण मेळविली ॥२॥ अवतार हे चौघे जाले कैशापरी । सांगा आम्हां हरी उकलोनी ॥३॥ शिव तो निवृत्ती सोपान ब्रह्मास्थिती । ज्ञानदेव मूर्ति विष्णूची हो ॥४॥ ब्रह्मणी हे कळा माय मुक्ताबाई । विचारुनि पाही स्वयं मुक्ता ॥५॥ नामा म्हणे याला नाही पां उपाधी । पूर्ण हे समाधि ज्ञानदेवा ॥६॥