भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव मनुष्य सुताचें बाहुलें । बापें बोळवणा सांगातें दिलें

dev manushya sutachen bahulen | bapen bolavana sangaten dilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव मनुष्य सुताचें बाहुलें । बापें बोळवणा सांगातें दिलें ॥१॥ शेवट पालऊन दिसे मधु । नेसो जाय तंव अवघाचि संबंधू ॥२॥ आंत बाहेरी अवघेचि सूत । स्वरूप देखतां निवताहे चित्त ॥३॥ नीच नवा शोभतु साउला । एका जनार्दनीं मिरवला ॥४॥