भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे नाम्या पाहे । ज्ञानदेव मींच आहे

dev mhane namya pahe | dnyanadev minch ahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव म्हणे नाम्या पाहे । ज्ञानदेव मींच आहे ॥१॥ तो आणि मी नाहीं दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥ माझ्या ठायीं ठेवीं हेत । सोड खंत खंडी द्वैत ॥३॥ नाम्या उमय मानसीं । ऐसें म्हणे ह्रषिकेशी ॥४॥