भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंचि समाधि ज्ञानदेवा

dev mhane namaya brahmakshetra adi | yethenchi samadhi dnyanadeva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंचि समाधि ज्ञानदेवा ॥१॥ चौयुगां आदिस्थळ पुरातन । गेले तें नेमून मुनिजन ॥२॥ चालिले सकळ जाले ते विकळ । अनादि हें स्थळ ज्ञानदेवा ॥३॥ नामा म्हणे आम्हां सांगितलें हरी । दीर्घध्वनि करी वोसंडोनी ॥४॥