भजनी मालिका

भजने

तुज सगुण जरी ध्याऊं तरी तुं परिमित होशी । तुज निर्गुण जरी ध्याऊं तरी तूं लक्षा न येसी । साचचि वेद पुरुषा न कळे श्रुति अभ्यासेंसी । तो तुं नाभाचा जो साक्षी शब्दें केवीं आतुडसी ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

तुज सगुण म्हणों की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥ अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ध्रु०॥

तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥ शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥१॥ कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुजलागीं माझा जीव झाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं व्यापक विश्व जाणा । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

तुजवांचोनि कांहीं गोड न वाटे जीवा । मज दिव्य केशवा पाय तुझे ॥१॥ लौकिकापासुनि कधीं सोडविसी । सांग ह्रषिकेशी उघडोनि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुजवांचोनियां वैकुंठनायका । आह्मांसी घटिका युग होय ॥१॥ अस्तमान होतां येसी तूं गोकुळीं । मुखावरी धुळी गोर-जांची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुजविण आम्हां कोण आहें देवा । धांव यादवराया मायबापा ॥१॥ पडिलोंसे डोहीं प्रपंच आवर्ती । कोण करी शांति तुजविण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥ न करीं विठ्ठला आतां लाजिरवाणें । मी तुझें पोसणें पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥ लागलीसे आस पाहासे वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम