भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा

tujavin konan | sharan jaun narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥ ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥२॥ तुका म्हणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥३॥