भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविणं कांहीं । स्थिर राहे ऐसें नाहीं

tujavinan kanhin | sthir rahe aisen nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजविणं कांहीं । स्थिर राहे ऐसें नाहीं ॥१॥ कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥ मोकलिली आस । सर्वभावें झालों दास ॥२॥ तुका म्हणे तूं चि खरा । येर वाउगा पसारा ॥३॥