भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं व्यापक विश्व जाणा

tujavachuni maganen kay kona | mahimandalin vyapak vishva jana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं व्यापक विश्व जाणा । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥१॥ नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका । मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नासे काम ॥२॥ हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी । करूं मुखवाणी कसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥३॥ भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वर्णितां शीणला शेषफणी । असो जीव भाव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काई ॥४॥ दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पायिं तो राख देव । असें मागतों तुझी पादसेवा ॥५॥